Wednesday, November 5, 2008

शुभेच्छा

शुभेच्छा असतात
      उज्वल भवितव्यासाठी
मनापासून दिलेल्या
      मनातलं प्रेम जोपासण्यासाठी...

शुभेच्छा असतात
      उत्साही मन उमेदीनं फुलविण्यासाठी
अपेक्षांची भव्य ध्येय
      सत्यात साकारण्यासाठी...

शुभेच्छा असतात
      घडण्यासाठी, घडविण्यासाठी
आकांक्षाची घेऊन उंच भरारी
      ’जगावेगळं’ करुन दाखविण्यासाठी...


1 comment:

Anonymous said...

छान आहे कविता....