Sunday, April 4, 2010

तीन पिढ्यातलं अंतर

तीन पिढ्यातलं अंतर...

’जनरेशन गॅप’ हा शब्द कधी कधी उगाच केलेला बागल बुवा वाटतॊ, तर कधी कटू वास्तव!
पण खरच आपले अनुभवच बघा ना;
छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे अगदी टेंन्शन घेऊन पाहणारी घरातली मोठी मंडळी; ’होऊन जाईल रे’ या आत्मविश्यासानं प्रत्येक गोष्टीला सामोरी जाणारी आपली पिढी आणि वास्तवाची पर्वाच न करणारे टिन एजर्स. गोष्ट एकच, पण त्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन किती निराळा! ’कधी एकदाचं होतयं’ ही भूमिका हायपर होऊन घेणारी जेष्ठ मंडळी, ’जरा छान वेळ देऊन करूयात’ अस स्वप्न रंगविणारी मधली फळी आणि ’कशाला? काय होणार आहे करून’ अस तारूण्याच्या धुंदीत म्हणणारी यंगस्टर्स.
ही दृष्टी वयाची, काळाची, कि तत्वांची? कदाचित या सार्‍यांच्या एकत्रित परिणामांची!
पण ह्या परिणामांचा शेवट एकच वाद! कधी मिटणारे तर कधी विकोपाला जाणारे.
म्हणून हे अंतर मिटवायलाच हवं, कधी कुणी चार पावलं पुढं जाऊन तर कधी कोणी दोन पावलं मागे येऊन...
कारण नात्यांची गोडी अवीटच असते!
जनरेशन गॅपच्या नावाखाली ही नात्यांची सुगंधित फुलं कोमेजू देणं खरंच परवडण्यासारखं नाही.
पटतय ना?