वाटते मला कधी
मृगजळासम प्रीत ही
नाते असूनही नसण्याची
जगावेगळी रीत ही...
सदैव गाते श्वासामधूनी
नित्य तिच्या भासामधूनी
स्वप्नामधूनी सत्यामध्ये
जगण्याची रीत ही...
विरह असो वा क्षण भेटीचा
क्षण प्रीतीचा क्षण मोहाचा
जपते मनामनाची नाती
तरीही अनामिक रीत ही...!
Friday, February 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment