Saturday, March 29, 2008

तुझी भेट...

तुझी भेट होण्याआधी
सारं कसं शांत होतं...
तुझ्या भेटीनंतर मात्र
सारं जगंच बदललं...
माझ्या मनाचं पाखरू
आकाशभरारी लागलं घेऊ
सोडून सारी बंधनं
नवी स्वप्न लागलं विणू
हे स्वप्नच आता जीवन घडवणार होतं...
तुझी भेट होण्याआधी
सारं कसं शांत होतं...
फुललेल्या केशरी गुलमोहरात
हरवितं जसं हिरव्या पानांच अस्तित्व
तसं तुझ्यात सामावलं माझं अस्तित्व
हे समर्पण जीवनाला सार्थ करणार होतं...
तुझी भेट होण्याआधी
सारं कसं शांत होतं...
ह्र्दयाने ओळखलं भावनांचं मूक स्पंदन
आणि गुंफलं हे प्रीतीचं रेशमी बंधन
या बंधनातच जीवन आता फुलणार होतं...
तुझी भेट होण्याआधी
सारं कसं शांत होतं...

3 comments:

नितीन बगाडे said...

छान लिहीले आहे. . .

मोरपीस said...

फ़ार छान ब्लॉग आहे.आपल्या ब्लॉगसाठी आपल्याला अनेक शुभेच्छा

K P said...

good poem..have you tried marathi gazal?